Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
टॉप न्यूज़देशमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़संगमनेर

गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र उत्सव;-आ खताळ

गुरुजनांच्या आदर्शांचे आचरण करण्याचा संकल्प करू या

गुरुजनांच्या आदर्शांचे आचरण करण्याचा संकल्प करू या

संगमनेर : (सुदिनन्यूज नेटवर्क)
गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील ज्ञान, संस्कार, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा पवित्र उत्सव असून जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा मंगल दिवस आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरुंचे स्मरण करत त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचा संदेश गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार अमोल खताळ यांनी दिला
आमदार खताळ म्हणाले की जीवना तील पहिले गुरु आई-वडील असतात नंतर शिक्षक, संत-महंत, आध्यात्मिक मार्गदर्शक तसेच समाजाला योग्य दिशा देणारे प्रत्येक व्यक्तिमत्त्व हे आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार असतात. त्यांच्या शिकवणुकीतूनच संस्कार, नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेची प्रेरणा मिळते. त्यामुळे गुरुंचे स्थान भारतीय संस्कृतीत सर्वोच्च मानले गेले आहे.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त प्रत्येकाने आपल्या गुरुजनांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांच्या आदर्श विचारांचे आचरण करण्याचा संकल्प करावा. समाजात बंधुभाव, सेवा, सदाचार, संस्कार आणि मानवतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करणे आवश्यक आहे. सशक्त, सुसंस्कृत आणि प्रगत समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे हीच गुरुजनांना खरी आदरांजली ठरेल.
सद्गुरूंची कृपा सर्वांवर अखंड राहो, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, यश, समाधान आणि आनंद नांदो, अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!