आपले सरकार सेवा केंद्र रेंज साईड तात्काळ चालू करा ग्राहक पंचायत

अकोले (सुदिनन्यूज नेटवर्क)
अकोले आदिवासी तालुक्यामध्येपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०२६ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करताना अकोले तालुक्यातील शासकीय सुविधा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्र (सेतु) मधिल साईड बंद (सतत) असल्या बाबत व साईड तात्काळ चालू होण्याबाबतचे निवेदन अकोले तालुक्याचे निवासी नायब तहसिलदार किसन लोहरे यांना दिल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक सचिव राम रुद्रे यांनी दिली.निवेदनात म्हटले आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज मुक्ती योजना २०२६ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीचे कामकाज सुरु आहे सदर योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी महा-आयटी यांनी विकसित केलेल्या संगणकीय पोर्टलवर प्रसिद्ध झालेली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी आधार (लिंकिंग) प्रामाणीकरण करणे गरजेचे, आवश्यक आहे.तसेच यादितील पात्र लाभार्थी शेतकरी यांनी आपले सरकार सेवा केंद्रातुन त्यांचे बॅंक खाते, खात्याचे आधार प्रमाणीकरण करताना त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारचे शुल्क (पैसे) आकारण्यात येऊ नये याबाबत जिल्हाधिकारी यांचा आदेश जारी सर्व आपले सरकार सेवा केंद्र(सेतू) चालकांना सुचित केले आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये असे शासनाने सुचित केल्या मुळे सेतु मधिल रेंज साईड बंद आहे काय? असा प्रश्न पात्र शेतकरी ग्राहकांचा संभ्रम झाला आहे.
वरिल संभ्रम काढण्यासाठी शेतकरी ग्राहक यांना शासकिय सुविधा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्रा मधिल रेंज साईट तात्काळ चालू होण्यासाठी संबधितांना आदेश देण्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छींद्र मंडलीक, सचिन राम रूद्रे ,अध्यक्ष दत्ता शेनकर विठ्ठल उघडे, लक्ष्मण मेंगाळ, कैलास तळेकर, बबन तिकांडे, अरुण शेळके, अनंत घाने, गंगाराम धिंदळे, सुरेश गबाले, रामदास पवार, ज्ञानेश्वर पुंडे, भाऊसाहेब वाकचौरे , दत्तात्रय मुठे, अशोक उघडे, गणपत थिगळे
आदिंचे नावे आहे.

