मायसिटीहब ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड व सुदिन न्यूजच्या संगमनेर शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा
मा.नामदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार अमोल खताळ,यांच्या शुभहस्ते उद्घाटन; मान्यवरांच्या उपस्थितीत पाडव्याला सोहळा.....

संगमनेर | प्रतिनिधी
डिजिटल युगात स्थानिक व्यवसाय, सेवा, रोजगार आणि जाहिरात क्षेत्राला एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या MYCITYHUB GLOBAL PRIVATE LIMITED तसेच MYCITYHUB.IN आणि SUDINNEWS.COM या डिजिटल माध्यमांच्या संगमनेर शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आह

या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आमदार डॉ. सुधीरजी तांबे, माननीय आमदार डॉ. सत्यजीत तांबे, माननीय आमदार अमोल खताळ, माननीय नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि माननीय आमदार डॉ. किरणजी लहामटे उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक व्यवसायांना डिजिटल व्यासपीठ देण्याचा अभिनव उपक्रम
MYCITYHUB GLOBAL PRIVATE LIMITED च्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार, सेवा पुरवठादार आणि रोजगार इच्छुकांना डिजिटल युगाशी जोडण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात येत आहे
MYCITYHUB.IN हे स्थानिक व्यवसायांसाठी डिजिटल व्यवसाय निर्देशिका आणि व्यावसायिक व्यासपीठ असून, त्याद्वारे व्यवसायांना ऑनलाइन ओळख, डिजिटल जाहिरात, ग्राहकांपर्यंत पोहोच आणि व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमांतर्गत व्यवसाय निर्देशिका, डिजिटल जाहिरात, वृत्त आणि प्रसारमाध्यमे, रोजगार व मनुष्यबळ सेवा, इलेक्ट्रॉनिक व्यापार तसेच माहिती तंत्रज्ञान आणि संगणक प्रणाली सेवा अशा विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
स्थानिक विकास आणि डिजिटल सक्षमीकरणाची नवी दिशा
संगमनेर आणि परिसरातील व्यावसायिकांना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, स्थानिक व्यवसायांना अधिक व्यापक ग्राहकवर्ग मिळावा आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळावी, या उद्देशाने MYCITYHUB चा हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
यासोबतच SUDIN NEWS या वृत्तसंकेतस्थळ आणि यूट्यूब वृत्तवाहिनीच्या माध्यमातून स्थानिक बातम्या, सामाजिक विषय आणि जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सस्नेह व आग्रहाचे निमंत्रण
या ऐतिहासिक आणि आनंददायी सोहळ्यास आपण उपस्थित राहून MYCITYHUB GLOBAL PRIVATE LIMITED आणि SUDIN NEWS परिवारास शुभेच्छा, आशीर्वाद व प्रोत्साहन द्यावे, ही नम्र विनंती.
दिनांक : मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६वेळ : सकाळी ११.०० वाजता
स्थळ : MYCITYHUB GLOBAL PRIVATE LIMITED, TOPTEN IMPERIAL, तिसरा मजला, यशोधन समोर, नाशिक रोड, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर.
निमंत्रक

सुदिन राजेमाने
संचालक व मुख्य संपादक – SUDIN NEWS
जयश्रीताई सुदिन राजेमाने
संचालक व विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत तांभोळ
चि. धनराज सुदिन राजेमाने
कु. हिंदवी सुदिन राजेमाने
तथा समस्त राजेमाने परिवार व ग्रामस्थ तांभोळ
आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा …..!





