मायसिटीहब ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडआणि सुदिनन्यूज कार्यालयाचे भव्य उद्घाटन नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न
डिजिटल व्यवसायविश्व आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात संगमनेरमध्ये नवी सुरुवात......माजी आमदार मा. डॉ. सुधीरजी तांबे

संगमनेर (सुदिनन्यूज नेटवर्क)
मायसिटीहब ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडआणि सुदिन न्यूज यांच्या संगमनेर येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे संगमनेरच्या डिजिटल व्यवसायविश्व आणि पत्रकारिता क्षेत्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

डिजिटल व्यापार ही काळाची गरज; MYCITYHUB GLOBAL च्या माध्यमातून स्थानिक व्यवसायांना व्यासपीठ….!
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल व्यापार, ऑनलाइन व्यवसाय आणि डिजिटल मार्केटिंग ही केवळ आधुनिक संकल्पना राहिलेली नसून भविष्यातील आर्थिक विकासाची महत्त्वपूर्ण गरज बनली आहे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतींमध्ये मोठे परिवर्तन घडत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक व्यापारी, लघुउद्योजक, सेवा पुरवठादार आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांना डिजिटल माध्यमांशी जोडणे ही काळाची गरज बनली आहे.याच दूरदृष्टीतून MYCITYHUB GLOBAL PRIVATE LIMITED या कंपनीने MYCITYHUB या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून स्थानिक व्यवसायांना आधुनिक डिजिटल ओळख देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
www.mycityhub.in हे केवळ व्यवसायांची माहिती उपलब्ध करून देणारे पोर्टल नसून स्थानिक व्यापार, सेवा, ग्राहक आणि उद्योजक यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडण्याचा व्यापक प्रयत्न आहे. या माध्यमातून किराणा दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था, कृषी सेवा, बांधकाम व्यावसायिक, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वाहन सेवा, विविध व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना डिजिटल स्वरूपात आपली ओळख निर्माण करता येणार आहे.
ग्रामीण आणि शहरी व्यवसायांना डिजिटल संधी
आज मोठ्या शहरांतील अनेक व्यवसाय डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, वेबसाइट आणि ऑनलाइन जाहिरातींचा प्रभावी वापर करत आहेत. मात्र ग्रामीण भागातील अनेक छोटे व्यावसायिक अद्याप या सुविधांपासून दूर आहेत. अशा व्यावसायिकांना परवडणाऱ्या दरात डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यवसायाची माहिती अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ,
डिजिटल व्यापार ही काळाची गरज; MYCITYHUB.IN च्या माध्यमातून स्थानिक व्यवसायांना व्यासपीठ आहे.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल व्यापार, ऑनलाइन व्यवसाय आणि डिजिटल मार्केटिंग ही केवळ आधुनिक संकल्पना राहिलेली नसून भविष्यातील आर्थिक विकासाची महत्त्वपूर्ण गरज बनली आहे. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतींमध्ये मोठे परिवर्तन घडत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक व्यापारी, लघुउद्योजक, सेवा पुरवठादार आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांना डिजिटल माध्यमांशी जोडणे ही काळाची गरज बनली आहे.
याच दूरदृष्टीतून MYCITYHUB GLOBAL PRIVATE LIMITED या कंपनीने MYCITYHUB.IN या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून स्थानिक व्यवसायांना आधुनिक डिजिटल ओळख देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
स्थानिक व्यवसायांना डिजिटल व्यासपीठ, पत्रकारितेला नवी दिशा मायसिटीहब ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून स्थानिक व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांना आधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्थानिक व्यवसायांची डिजिटल ओळख निर्माण करणे, त्यांच्या सेवांचा व्यापक प्रचार करणे आणि ग्राहकांना विश्वासार्ह सेवा सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.त्याचबरोबर सुदिनन्यूजच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न, सामाजिक घडामोडी, जनहिताच्या बातम्या आणि परिसरातील महत्त्वपूर्ण घटनांना प्रभावीपणे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नव्या उपक्रमाचे अभिनंदन करून डिजिटल क्षेत्र आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला चालना मिळावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. स्थानिक पातळीवर उद्योग, व्यवसाय आणि माहितीच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्यवर पत्रकार श्री. भाऊसाहेब वाकचौरे आणि कवी ज्ञानेश पुंडे यांनी प्रभावीपणे केले. उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांच्या सहभागामुळे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.मायसिटीहब ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आणि सुदिन न्यूजच्या या नव्या वाटचालीमुळे संगमनेर परिसरातील डिजिटल व्यवसाय, स्थानिक माहिती प्रसार आणि पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय डॉ. सुधीरजी तांबे, डॉ. नामदेराव गुंजाळ, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक माननीय मधुकर माने, तांभोळच्या विद्यमान सरपंच जयश्रीताई माने, ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, वसंत बंदावणे सर, अमृतसागर दूध संघाचे व्हाइस चेअरमन माननीय रावसाहेब वाकचौरे तसेच कॉन्ट्रॅक्टर मा अनिल भाऊ डोळस ,मा बाळासाहेब मानेसर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी राम रुद्रे, कवी ज्ञानेश पुंडे, प्रा. किरण शिंदे सर, संतोष कोकणे, मुरलीधर शिनारे, संजय गोरडे , रावसाहेब शेलकर , देवराम माने, विनोद हांडे, कोकणे सर,अमोल गोसावी, आत्माराम माने, राजेंद्र माने,भालेरावशेठ, बाबासाहेब वाकचौरे, प्रताप आंबरे यांच्यासह,पत्रकार मित्र, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.





