अमोल खताळटॉप न्यूज़धर्मलोकल न्यूज़संगमनेरसामाजिक

बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच भाऊबीजेचा खरा संदेश…!

आमदार खताळ यांनी कुटुंबीयांसमवेत साजरी केली भाऊबीज....

संगमनेर / प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीमध्ये भाऊबीज या सणाला विशेष महत्त्व आहे. बहीण-भावाच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि अतूट नात्याचे प्रतीक म्हणून हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करणे, तर भावाने बहिणीच्या सुख-दुःखात कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, ही या सणाची खरी शिकवण आहे. बहिणीचे हे पवित्र नाते आयुष्यभर जपले पाहिजे. तिचे संरक्षण करणे, तिला सन्मानाची वागणूक देणे आणि तिच्या स्वप्नांना बळ देणे, हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे, असा संदेश आमदार अमोल खताळ यांनी भाऊबीज सणानिमित्त दिला.

शहरातील घुलेवाडी रोड येथील आमदार खताळ यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांसमवेत भाऊबीज सण साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार खताळ म्हणाले की, भाऊबीज हा केवळ पारंपरिक सण नसून आदर, कौटुंबिक जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा दिवस आहे. बहिणीच्या आयुष्यात सुरक्षितता, स्वाभिमान आणि आनंद निर्माण करण्यासाठी प्रत्येक भावाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. बहिणीला केवळ सणाच्या दिवशी शुभेच्छा देण्यापुरते हे नाते मर्यादित न ठेवता, तिच्या प्रत्येक अडचणीत आणि आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. हाच भाऊबीज सणाचा खरा संदेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, तसेच लखपती दीदी योजना आणि महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

– अमोल खताळ, आमदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!