भाऊबीज हा सण बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
दीपावलीच्या काळामध्ये सरकारने जी आश्वासने दिली आहेत ती मात्र दहा महिन्यांमध्ये पूर्ण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

संगमनेर ( प्रतिनिधी ) जीवनामध्ये अनेक संकटे, अनेक प्रश्न असतात. तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु अशा वाटचालीतूनही दिवाळी हा आनंदाचा कालखंड चार दिवस सर्वांनी घालवला पाहिजे असे सांगताना येणारे वर्ष हे दुष्काळाचे वर्ष आहे. शेतकरी शेतमजूर अडचणीत आहे .अशा परिस्थितीत आपल्याला संकटाला सामोरे जायचे आहे. प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीमध्ये सर्व जाती धर्म एकत्र येऊन बंधू भावाने राहतात. एकत्र सण साजरे करतात. त्यापैकी बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

मा. नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या इंदिरानगर येथील प्रभा निवासस्थानी भाऊबीज प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, आदींसह कुटुंबातील सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सौ दुर्गाताई तांबे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे औक्षण केले तर सौ कांचनताई थोरात यांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे औक्षण केले तर डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी बंधू आमदार सत्यजित तांबे यांचे औक्षण केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, वर्षभर प्रत्येकजण कष्ट करतो धावपळ करतो .मात्र दिवाळीचा हा कालखंड सर्वांच्या जीवनात आनंद देणार असतो. हा समानतेचा बंधू भावाचा मानवतेचा संदेश देणारा असा गोडीचा सण आहे. हा सण सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे. भाऊबीज हा दीपावली मधील महत्त्वाचा उत्सव असून बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण आहे. बहिण भावांमधील जिव्हाळा आपुलकी प्रेम यामधून अधिक दृढ होते.
.आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, दीपावली हा आनंदाचा कालखंड आहे. दर दीपावली लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी होते. थोरात साहेबांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे. आपण सर्व त्या परिवारातील घटक असून जीवनाचा हा कालखंड आनंदी जावा यासाठी सर्वांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.





