Uncategorizedअकोलेटॉप न्यूज़महाराष्ट्रराजनीतिराज्यलोकल न्यूज़

नाशिक-पुणे रेल्वेबाबत केंद्रसरकार सकारात्मक.! खास. भाऊसाहेब वाकचौरे

अकोले तालुका रेल्वे कृती समितीने खासदारांची भेट घेतली.

​अकोले-(प्रतिनिधी) : अकोले तालुका रेल्वे कृती समिती व अकोले तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने नाशिक-पुणे हायस्पीड मूळ संकल्पित मार्गानेच व्हावी याबाबतचे निवेदन आज अकोले तहसिल कार्यालयात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना देण्यात आले सदर प्रसंगीअकोल्याचे तहसीलदार श्री. सिद्धार्थ मोरे हे उपस्थित होते.
सध्या चर्चेत असलेल्या नाशिक,सिन्नर, देवठाण, संगमनेर, नारायणगाव पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग बाबतची स्थानिक पातळीवर जनसुनवणी घेण्यासंदर्भातील काकोडकर समितीची मुदत संपली असल्याने व सदर समिती सदस्य अद्यापही फिरकले नसल्याने अकोले तालुका रेल्वे कृती समितीने खासदारांची भेट घेतली.यावेळी खासदार वाकचौरे म्हणाले की,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्नव यांची नुकतीच मी भेट घेतली असुन या संदर्भात त्यांनी नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेमार्गा बाबत सकारात्मक भूमिका मांडली व सदर रेल्वेमार्गाबाबत येणाऱ्या अडचणी राज्यसरकारच्या आखत्यारीतील असुन सदर अडचणीबाबत राज्यसरकारने पुढील कार्यवाही करावी अशी भूमिका मांडली.

   याप्रसंगी नाशिक, पुणे, अहिल्यानगरच्या रेल्वे कृती समितीचे सदस्य, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, माधवराव तिटमे, कवी ज्ञानेश पुंडे, राम रुद्धे,वसंत बाळसराफ, अ‍ॅड. राम भांगरे, सेवानिवृत्त प्राचार्य आदिनाथ सुतार , कारभारी बंदावणे,नारायण जगधणे, सौ. सुमनताई जाधव, पांडुरंग पथवे, बबनराव तिकांडे, जालिंदर घोडके,दत्ता शेणकर,भाऊसाहेब आभाळे,रामदास पांडे यांच्यासह विविध नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!