देवकवठे येथे सर्वस्व मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग
विविध ज्येष्ठ अभिनेत्यांच्या उपस्थितीमध्ये मराठी चित्रपटाचा शुभारंभ

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या देवकवठे येथील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त बीआरजी फिल्मचा ॲड बी आर गांडोळे दिग्दर्शित आणि ज्ञानेश्वर माऊली मुंगसे निर्मित असलेल्या सर्वस्व या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, दिग्दर्शक ॲड बी आर गांडोळे, देव माणूस फेम पुष्पा चौधरी यांच्यासह विविध मराठी चित्रपट अभिनेते उपस्थित होते.
जगदंबा माता मंदिर देव कवठे येथे नवरात्र निमित्त आयोजित सर्वस्व या चित्रपटाच्या पोस्टरचे लॉन्चिंग झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेत्री पुष्पा चौधरी,राजहंस दूध संघाचे संचालक भारत शेठ मुंगसे, दिग्दर्शक ॲड बी आर गांडोळे,नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवतराव आरोटे, उद्योजक एकनाथ मुंगसे, डॉ.शिरीष शेपाळ,इंजिनीयर सुभाष सांगळे, निर्माते ज्ञानेश्वर माऊली मुंगसे, चित्रपट अभिनेत्री दिपाली चौगुले ,अभिनेता पांडुरंग वाघमारे, राजू कहांडळ राजू मुंगसे पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, उद्योजक शिवराज मुंगसे, नामदेव कहांडळ, सुरेश मुंगसे, प्रताप मुंगसे,विलास मामा मुंगसे, संतोष दगडू कहांडळ, अनिल गाजरे, अण्णा सोपान मुंगसे, इंजिनीयर सुनील मुंगसे ,अभिमन्यू मुंगसे, बाळासाहेब गुडघे मच्छिंद्र कहांडळ सुरेश मुंगसे तुकाराम कहांढळ बाबासाहेब गाजरे, सुभाष मुंगसे, संतोष आरोटे ,भाऊसाहेब सांगळे , विश्वनाथ आरोटे, शैलेश शिंदे पत्रकार रामनाथ बोराडे यांच्यासह गावातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते
देवकवठे गावाला नाट्य कलेची मोठी परंपरा असून ज्ञानेश्वर मुंगसे व हे नाट्य कलावंत आहे. त्यांनी विविध मालिकांमधून भूमिका केले असून ते सर्वस्व हा मराठी चित्रपट निर्मित करत आहेत याचबरोबर पुणे येथील डॉ. गिरीश शेपाळ हेही निर्माते आहेत. ॲड बी आर गांडोळे हे दिग्दर्शन करत आहेत. हजारो नागरिक व महिलांच्या उपस्थितीमध्ये या चित्रपटाचे भव्य पोस्टर लॉन्चिंग करण्यात आले.
यावेळी बोलताना सुनील गोडबोले म्हणाले की ग्रामीण भागामधून मराठी चित्रपट प्रदर्शित होतो आहे या अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या भागातील नागरिकांसाठी जगदंबा माता हे श्रद्धेचे स्थान आहे जगदंबा मातेच्या परिसरात या चित्रपटाची शूटिंग होणार असून नागरिकांचा सहभाग कौतुकास्पद आहे.
तर भागवतराव आरोटे म्हणाले की ग्रामीण भागातील हा चित्रपट असून या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळणार आहे जगदंबा माता परिसर देवीचे महात्म्य आणि दुष्काळी भाग असा हा चित्रपटाचा विषय असून याबद्दल अनेक नवीन कलाकारांना संधी मिळणार आहे.
तर ज्ञानेश्वर मुंगसे म्हणाले की जगदंबा मातेच्या देवीचे महात्म्य महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यासाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे यामध्ये सर्व गावकरी तरुण मंडळ यांचे मोलाचे सहकार्य असून सर्व टीम चांगली काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर दिग्दर्शक बी आर गांडोळे म्हणाले की ग्रामीण भागामधून आणि संगमनेर तालुक्यातून हा चित्रपट निर्माण होत असून याच परिसरामध्ये याची सर्व चित्रीकरण होणार आहे. तालुक्यातील निवेदित कलाकारांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी मराठी चित्रपट व मालिकांमधील डी आर काळे पांडुरंग चिरणे लता तरडे नसीमा मुजावर संदीप काळे प्राजक्ता गाडेकर गुड्डी मुजावर पूजा काटे मेघा पाटील अनुराधा शिंदे सनी अडांगळे राजा चव्हाण भाऊसाहेब पवार सोनू काळे माजीद खान राजन झांबरे अरुण शेलार ठाकूर प्रमिला काळे आदी कलाकार उपस्थित होते.


संपादक – सुदिन राजेमाने




