अकोलेटॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़संगमनेर

नाशिक -पुणे हायस्पीड रेल्वेसाठी संगमनेर रेल्वे कृती समितीच्या वतीने देवगावकरांचे जागरण गोंधळ घालून आंदोलन…

शासनाच्या वेळकाढू धोरणावर प्रखरपणे निषेध करून भविष्यात हा लढा संविधानिक मार्गानेच पण अधिकआक्रमक करू ......... दत्ता ढगे

संगमनेर: (सुदिन न्यूज नेटवर्क)

नाशिक-पुणे मूळ संकल्पित हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. या रखडलेल्या 

प्रश्नाबाबत राज्य शासनाने जागतिक शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांची समिती स्थापन केली होती. या समितीला अभ्यासासाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, ही मुदत संपूनही शासनाने अद्याप यावर कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. याच प्रश्नाची सरकारला जाणीव करून देण्यासाठी संगमनेर रेल्वे कृती समितीच्या वतीने देवगाव ग्रामस्थांनी संगमनेर एसटी स्टँडवर एक दिवसाचा अनोखा ‘जागरण गोंधळ’ कार्यक्रम आयोजित करून सरकारचे लक्ष वेधले.याप्रसंगी संगमनेर चे धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते दत्ता ढगे यांनी प्रस्थापितांवर आणि शासनाच्या वेळकाढू धोरणावर प्रखरपणे निषेध करून भविष्यात हा लढा अधिक संविधानिक मार्गानेच पण आक्रमक करू असा इशारा दिल

आंदोलनाला अकोले रेल्वे कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला,
विखे-थोरातांवर राजकीय निशाणा आणि ‘पाणी बंद’चा इशारा
या आंदोलनादरम्यान बोलताना ज्येष्ठ नेते विनय सावंत यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर कडाडून टीका केली. “जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विखे आणि थोरात यांची ‘सहमती एक्सप्रेस’ अगदी सुसाट धावते, मग जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या नाशिक-पुणे मूळ संकल्पित हायस्पीड रेल्वे मार्गासाठी ही एक्सप्रेस का धावत नाही?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, “जर या भागाला रेल्वे मिळाली नाही, तर पाणी बंद करू,” असा आक्रमक इशाराही विनय सावंत यांनी यावेळी दिला.

मान्यवरांची व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
एसटी स्टँड परिसरामध्ये झालेल्या या आंदोलनात शासनाच्या उदासीनतेचा तीव्र निषेध करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमास दत्ता ढगे, संतोष फापाळे, विनय सावंत, राजाभाऊ अवसक, सुदिनजी माने, भाऊसाहेब वाकचौरे, सौ. शिबा गायकवाड, ज्येष्ठ नेते श्री. रवींद्र लामखेडे, शंकर पावसे, मधुसूदन शिंदे, किरण देशमुख, संतोष शिंदे, संजय देशमुख या मान्यवरांसह देवगावचे ग्रामस्थ आणि रेल्वे कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने आतातरी या आंदोलनाची दखल घेऊन नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेबाबत तातडीने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!