Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
Uncategorized

भोजापूर धरण भरले, कालव्यातून पुरचारीला पाणी सोडले

संगमनेर |सुदिन न्यूज नेटवर्क
भोजापूर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात सातत्याने पाण्याची आवक सुरू त्यामुळे ३६१ दशलक्ष घनफूट इतकी क्षमता असलेले भोजापुरचे धरण गुरुवारी पूर्ण क्षमतेने भरले असून ते ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या ओव्हरफ्लोचे पाणी डाव्या कालव्यातून संगमनेर तालुक्यातील भोजापुर पूरचारीला सोडले आहे. या पाण्याने चारीवर अवलंबून असणारे गावातील बंधारे भरले जाणार आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी समाधानी झाला आहे
सिन्नर तालुक्यात म्हाळुंगी नदीवर ३६१ दशलक्ष घनफूट क्षमतेचे भोजापुर धरण आहे या धरणातील पाण्यावर संगमनेर व सिन्नर या दोन तालुक्यातील काहीगावातील शेतकरी अवलंबून आहे. या धरणाच्या ओव्हर फ्लोचे पाणी बंधाऱ्यांना सोडण्याचे नियोजन नाशिक जलसंपदा विभाग यांनी केले आहे . या आवर्तनामुळे कालव्या लगतच्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असून भूजल पातळी उंचावण्यासही हातभार लागणार आहे. तसेच परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे.
जलसंपदा विभागाने लाभार्थी शेतकरी, ग्रामपंचायती तसेच संबंधित यंत्रणांनी कालव्याजवळ आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. कालव्यात पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याने नागरिकांनी कालव्याच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा तसेच जनावरे आणि लहान मुलांना कालव्याजवळ जाण्या पासून रोखावे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी काळात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असल्याने खरीप पिकांना मोठा आधार मिळणार आहे. जलसंपदा विभागाकडून आवर्तनाचे नियोजन बद्ध व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकजलसंपदा विभागाचे जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता सुभाष पगारे यांनी दिली.
चौकट
भोजापुर धरण ओव्हरफ्लो झाले आहें पण नियोजन करत असल्या मुळे हे शक्य झाले आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार अमोल खताळ यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे भॊजापूर चारीला आवर्तन सोडणे शक्य झाले आहे.या आवर्तनातून संगमनेर तालुक्यातील पळसखेडे ,निमोण,पारेगाव,सोनेवाडी सोनोशी, नान्नज दुमाला या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

श्री भीमराज चत्तर
भाजप जेष्ठ नेते व माजी सरपंच नान्नज दुमाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!