Welcome to Sudin News   Click to listen highlighted text! Welcome to Sudin News
अकोलेटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़संगमनेर

अकोले तालुक्यातील एक अभ्यासू वक्ता आणि शिवसेनेची बुलंद तोफ — प्रमोद मंडलिक

एकता - समता - बंधुता जोपासणारा कार्यकर्ता...!

 

जन्मदिन विशेष लेख….

प्रमोद एका वाक्यात सांगायचे झाले तर प्रयत्नशील प्रयत्नवादी शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा सच्चा वारसदार म्हणजे प्रमोद अकोले शहराच्या कुशीत वसलेल्या माळीझाप येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण अगस्ती विद्यालय आणि महाविद्यालयात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सुदंर हस्ताक्षर शुद्ध मराठी भाषेतील बोली व्याकरण आणि इंग्रजी विषयाची आवड या काही शाळेतील विद्यार्थी म्हणून प्रमोद चे विषेशणे एक खेळाडू म्हणूनही प्रमोद क्रिडा शिक्षकांचा आवडता खेळाडू होता कब्बडी आणि जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर अनेक बक्षीसाची लयलूट करणारा प्रिन्सिपल खांडगे सरांचा गुणवंत खेळाडू म्हणून प्रमोद प्रसिद्ध होते गोळाफेक या खेळात प्रमोद तरबेज खेळाडू होता कब्बडी तील पकड आणि ठूस यामध्ये समोरचा संघ गारद करण्याची त्याच्यात ताकद होती क्रिडा शिक्षक संपत नाईकवाडी सर आणि वालझाडे सर हे प्रमोद चे क्रिडा शिक्षक होते संघाचा कर्णधार वर्गाचा मॉनिटर यातून त्याचे सामुहिक संघटन कौशल्य उदयास आले.
शाळा महाविद्यालयात वाद विवाद स्पर्धा क्रांतिकारक समाजसुधारक यांच्या जयंती निमित्ताने प्रमोद चे हमखास भाषण असायचे पुढे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये पदार्पण करताना प्रमोद एक  वक्ता म्हणून ओळखला जाऊ लागला हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे प्रभावित होऊन प्रमोदने शिवसैनिकाची पताका खांद्यावर घेतली पंरतु चळवळीतील कार्यकर्ता हा त्याचा मुळ सामाजिक गाभा होता, कला वाणिज्य विज्ञान व दादासाहेब रूपवते यासह अगस्ती नामांतर व्हावे या यशस्वी लढ्यात प्रमोद ने स्व बाळा नवले, महेश नवले यांच्या सह सक्रिय सहभाग घेतला होता दुध आंदोलन ऊस आंदोलन जायकवाडी ला पाणी नेण्याला विरोध अलिकडचे रेल्वे आंदोलन यामध्ये आभ्यासू भुमिका मांडून अधिकारी वर्गामध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला संगमनेर कडे जाणारी पाणीपुरवठा पाईप लाईन ही वरुन न नेता जमिनीतून न्यावी म्हणून परिणाम कारक संघर्ष केला आणि पाईप लाईन जमिनीतून न्यावी लागली कोरोना काळात तर प्रमोद यांचे काम विषेश उल्लेखनीय होते बेड, ऑक्सिजन, रेमडीसिवर उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले.
ओबीसींच्या प्रश्नांची सामाजिक तिव्रता लक्षात घेऊन एक निर्णायक लढा उभारुण तो अधिक व्यापक केला आपल्या राजकीय पक्षाच्या कक्षेबाहेर जाऊन त्यांनी कॉ अजित नवले, शिवाजीराजे धुमाळ,स्व मिनानाथजी पांडे,जालिंदर वाकचौरे विजय वाकचौरे पत्रकार भाऊसाहेब मंडलिक अशोक देशमुख आणि विषेश करून सहकार महर्षी सिताराम पाटील गायकर यांच्या बरोबर तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर उभे राहून साथ दिली आपल्या जन्मगावी लोकांमध्ये धार्मिक भावना वृद्धीसाठी सप्ताह उत्सव यामध्ये आयोजन म्हणून महत्त्वाची जबाबदारी घेत योग्य नियोजन केले.
अकोले नगरपंचायत मध्ये विरोधी पक्षनेते पदी राहून मुद्देसूद व अभ्यासपूर्ण विकास योजना मांडून सी ओ ची कौतुक शबासकीस पात्र ग्राहक पंचायत च्या माध्यमातून अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांच्या बरोबर तालुक्यातील अनेक प्रश्न निकाली काढून सर्वसामान्य माणसांशी एकरूप होऊन अनेक प्रशासकीय व्यापक लढे दिले मुंबई चे मंत्रालय असो वा दिल्लीचे संसद यामध्ये प्रशासकीय कामांसाठी एक अनुभवी म्हणून अनेकदा त्यांचा मुंबई दिल्ली वावर आढळून येतो.
जेष्ठ शिक्षण तज्ञ दारुबंदी आंदोलनातील सक्रिय सदस्य हेरंब जी कुलकर्णी यांच्या बरोबर ही प्रमोद जी अनेकदा दिसून आले जेष्ठ विधीज्ञ वसंतराव मनकर साहेब यांच्याशी असलेले जुने स्नेह सबंध त्यांनी आजही जपलेले आहे तर एम शेठ धुमाळ रामहारी तिकांडे यांच्या शी शिवसेना परिवार म्हणून ते धाकट्या भावा समान खाद्यांला खांदा लावून तटबंदी सारखे उभे आहेत.
सभा मोर्चे आंदोलने यामध्ये उपस्थित जन समुदायामध्ये नवचैतन्य आणण्याचे एक वेगळे कसब सिहंगर्जनेच्या रुपाने प्रमोद मध्ये आजही बघायला मिळते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर प्रमोद ने पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिक्याने जिंकली सुद्धा आपल्या वार्डात पायाभूत सुविधा यावर लक्ष केंद्रित करुन विकास कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नगरसेवक प्रमोद जी यांनी केला आजही प्रमोद यांच्या मातोश्री सौ विमलताई मंडलिक या विद्यमान नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना प्रमोद यांनी माजी खासदार लोखंडे साहेब विद्यमान खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे यांच्याशी विश्वासू सहकारी म्हणून राजकीय सबंध प्रस्थापित केले आणि त्यांच्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार प्रमुख म्हणून आपली भुमिका व वक्ता म्हणून कामगिरी चोखपणे बजावली आहे अकोले शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रमोद यांचेकडे आदर सन्मानाने बघीतले जाते प्रत्येकाच्या सुख दु:खात सहभागी होऊन अडचणीत आलेल्या सर्वसामान्य माणसांना आपल्या परीने साथ देऊन मदत करुन ते आपल्या संवेदनशील व्यक्तीमत्वाचा दाखल देतात बोलण्यातील गोडवा दुसऱ्या प्रती पद प्रतिष्ठा सन्मान देण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात तालुक्यातील अनेक मातब्बर राजकीय वक्त्या मध्ये त्यांचे नाव घेतले जाते आजही या सोशल मीडिया च्या जमान्यात त्यांनी आपली वाचन संस्कृती जपली आहे निरोगी निकोप अशी शरीर सपंदा त्यांच्या कडे आहे राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय राजकीय आर्थिक बाबीं वरील सखोल अभ्यास त्यांच्या चर्चेत दिसून येतो धार्मिक विषयांची मांडणी माहिती देताना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात जरासुद्धा गफलत न करता त्यांच्यातील पुरोगामी विचारांची देवाणघेवाण हलकीशी जाणून जाते.सध्या अगस्ती पतसंस्थेत संचालक म्हणून ही संचालक मंडळात आहे अकोले तालुका शिवसेनेत सक्रिय आहेत एकंदरीत एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रमोद सुपरिचित आहे.
आज सोमवार दिनांक २४ ऑगस्ट २०२६ श्रावण शुद्ध १२ शिव पूजन प्रमोदजी यांचा जन्मदिन अर्थात वाढदिवस यानिमित्ताने त्यांना मनस्वी शुभेच्छा व राजकीय सामाजिक आकांक्षा पुर्णत्वास जावो ही भारत मातेच्या चरणी प्रार्थना.

शब्दांकन लेखन व शुभेच्छुक

सुदिन माने – संपादक,सुदिन न्यूज

कवीज्ञानेश पुंडे पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!